Latest Marathi News

आजचे राशीभविष्य, गुरुवार ५ जानेवारी २०२३; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!

0 1,228

मेष:-
खर्चात वाढ संभवते. मानसिक चुळबुळ कमी करावी. आर्थिक नियोजनावर विचार कराल. काही गोष्टी शांत राहून बघत रहा. तुमच्या बाबत गैरसमज वाढू शकतो.

 

 

वृषभ:-
कामे उरकताना दमछाक होऊ शकते. नवीन काम अंगावर येऊ शकते. आपली क्षमता लक्षात घ्यावी. विद्यार्थी वर्ग खुश असेल. दिवस बर्‍यापैकी व्यस्त राहील.

Manganga

 

मिथुन:-
मन स्थिर ठेऊन विचार करावा. कामात सकारात्मक बदल संभवतात. चंचलतेवर मात करावी लागेल. नियोजनबद्ध कामे करा. एकाचवेळी अनेक कामे हाती घेऊ नका.

 

कर्क:-
मनातील इच्छा पूर्ण होईल. आपल्या धाडसाचे फळ मिळेल. मुलांबाबत आत्मविश्वास वाढेल. कचेरीची कामे मार्गी लावाल. ग्रहमानाची साथ लाभेल.

 

सिंह:-
अपेक्षित उत्तर हाती येईल. कामात अनुकूलता येईल. लहान प्रवास घडेल. हातातील कामात यश येईल. दिवस फलदायी ठरेल.

 

कन्या:-
सहकारी वर्ग मदत करेल. मानसिक स्वास्थ्य जपावे. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. इतरांना सढळ हाताने मदत कराल. नोकरदार वर्गाला दिवस चांगला जाईल.

 

तूळ:-
बोलताना अतिरिक्त शब्दांचा वापर टाळावा. महत्त्वाच्या निर्णयावर पुनर्विचार करावा. हातातील काम यशस्वी होईल. संभ्रमित गोष्टी पुढे ढकलाव्यात. दिवस संमिश्र राहील.

 

वृश्चिक:-
गोष्टी फार मनाला लावून घेऊ नका. एखादी नवीन संधी चालून येईल. एखादा वाद संपुष्टात येईल. मोठ्या लोकांकडून प्रशंसा केली जाईल. एखाद्या गोष्टीने मन विचलित होऊ शकते.

 

धनू:-
कामाव्यतिरिक्त इतर गोष्टी लक्ष वेधून घेतील. घरातील कामात जास्तीत जास्त वेळ घालवाल. तरुण वर्गाचे सहकार्य घ्याल. विद्यार्थ्यांनी संधीचे सोने करावे. ज्ञानात भर पडेल.

 

मकर:-
हातातील गोष्टी जपून ठेवा. अतिधाडस दाखवू नका. जुनी कामे आधी मार्गी लावावीत. मोठी खरेदी विचारपूर्वक करावी. जुगार खेळतांना सावध राहावे.

 

कुंभ:-
सारासार विचार करण्यावर भर द्यावा. आपले स्पष्ट मत देताना विचार करा. घरगुती गैरसमज टाळावेत. फसवणुकीपासून सावध राहावे. बौद्धिक क्षमता वाढेल.

 

मीन:-
हातातील कामातून आनंद मिळेल. काही खर्च अचानक सामोरे येतील. जवळच्या प्रवासात सावधानता बाळगा. नातेवाईकांशी संपर्क होऊ शकेल. जवळचे मित्र भेटतील.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!