“कोणी काय कपडे परिधान करावेत हा ज्याचा त्याचा अधिकार”: उर्फी जावेदच्या पेहरावावरून पुन्हा वादात वाढ!
पुणे : चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदवर टीका केली होती. उर्फीनं तोकड्या कपड्यात सार्वजनिक ठिकाणी फिरणं योग्य नाही, असं चित्रा वाघ यांनी म्हंटलं होतं. त्यावर रुपाली चाकणकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
रुपाली चाकणकर म्हणाल्या, कोणी काय कपडे परिधान करावेत हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. एखादा पेहराव ठरावीक व्यक्तींना अश्लील वाटत असेल पण इतरांना तो अश्लील वाटत नसतो. त्यामुळं आयोग अशा बाबतीत वेळ वाया घालवू शकत नाही. प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य आहे. म्हणूनच शेवटी कोणी काय कपडे घालावेत हा ज्याचं त्यानं ठरवायला हवं. त्यातूनही कोणी काय कपडे घातले, याचा इतिहास काढला तर फार मोठी यादी समोर येईल. त्यावर त्यांना ही उत्तरं द्यावी लागतील. तेव्हा कपडे परिधान करण्याचं स्वातंत्र्य द्यायला हवं, असं मतही रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केलं.

दरम्यान, राज्य महिला आयोगाकडे आतापर्यंत १० हजार ९०७ तक्रारी आल्या. यापैकी ९ हजार ५२० तक्रारी आम्ही निकाली काढल्या आहेत. त्यामुळं राज्य महिला आयोग व्यापक स्वरूपात काम करत आहे. आयोगाने काय करावं हे कोणी सांगायची गरज नाही. असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हंटलंय.