पाटणः पाटणमध्ये आज पत्रकारांबरोबर बोलताना भास्करराव जाधव यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांच्यावर टीका करताना त्यांनी शिंदे गटाने शिवसेनेच्या नावावर राजकारण कसे केले, हे बोलून दाखवले आहे.
आमदार भास्करराव जाधव म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाने विकास कामांना गती दिल्या असल्याचे बातम्या येत आहेत. आता जी विकास कामं केली जात आहेत, ती विकासकामं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात मंजून झालेली होती मात्र माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या कामांना शिंदे-फडणवीस सरकारने ही सगळी कामं थांबवली. त्यामुळे विकासाची कामं ही उद्धव ठाकरे, अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकाळात मंजूर झालेली आहेत. त्यामुळे शिंदे गट आज जरी ही आम्ही मंजूर केलेली कामं आहेत असं सांगत असली तरी ती विकासकामं ही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंजूर झालेली होती असंही भास्करराव जाधव यांनी सांगितले.

दरम्यान, आपण निवडून आल्यानंतर शिवसेना पक्षाचे चिन्हच त्यांनी संपवण्याचा डाव कसा केला हेही त्यांना यावेळी सांगितले. शंभूराज देसाई यांच्यामध्ये जर हिम्मत असेल तर त्यांनी शिवसेनेचं नाव न घेता राजकारण करून दाखवावं असा टोलाही त्यांना त्यांना लगावला आहे.