मुंबई : मॉडेल उर्फी जावेदनं ट्विट करत भाजपच्या महिला प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ यांना डिवचलं आहे.
उर्फी जावेद म्हणाली, “लवकरचं भाजपमध्ये प्रवेश केल्यास मी आणि चित्रू चांगल्या मैत्रिणी होणार आहोत. चित्रा वाघ यांच्या विरोधात वारंवार ट्विट समोर येत आहेत.

दरम्यान, उर्फी जावेदवरून चित्रा वाघ महिला आयोगाविरोधात आक्रमक झाल्या आहेत. महिला आयोगानं स्वतःहून दखल घेऊन जाब का विचारला नाही, असा सवाल चित्रा वाघ यांनी केलाय. तसेच त्या म्हणाल्या, कि महिला आयोगाची भाषा नकोय, तर कृती हवी आहे. सार्वजनिक ठिकाणी भर रस्त्यात उघडनागडं फिरणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का, असा सवालही वाघ यांनी केलाय.