मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केल्याचा दावा केला आहे. किरीट सोमय्या यांच्या दाव्यानंतर आमदार अनिल परब यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
अनिल परब म्हणाले, ‘सुरुवातीपासून मी सांगत होतो, या रिसॉर्टशी माझा काही संबंध नाही. आज इडीची संपत्ती जप्त केली आहे , त्या संपत्तीचे मालक सदानंद परब आहेत. या प्रॉपर्टीशी माझा काहीही संबंध नाही. बदनामी करायची यामागे हा उद्देश आहे, आता कारवाई झाली आहे, तर सदानंद परब हे मालक आहेत ते योग्य ती कायदेशीर कारवाई करतील. किरीट सोमय्या न्यायाधीश नाहीत. मी त्यांना उत्तर द्यायला बांधील नाही.मला ज्या तपास यंत्रणा प्रश्न विचारतील. त्यांना उत्तर देणे मी बंधनकारक आहे आणि त्याचे उत्तर मी देईन, असे अनिल परब यांनी स्पष्टीकरण केले.

दरम्यान, ‘माझी बदनामी झाली, याची कोर्टात जाऊन मी न्याय मागेन. दोन वर्षापासून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. सोमय्या काय म्हणतात याचा आमच्याशी संबंध नाही. जे काय म्हणायचे ते आम्ही कोर्टात बोलू, असे अनिल परब पुढे म्हणाले.