मुंबई :अनिल परब यांची ईडीकडून 10 कोटी 20 लाखांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, रत्नागिरीतील साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीने मनी लॉन्डिंगचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी अनिल परब यांची वारंवार चौकशी झाली. जवळपास चार ते पाच दिवस ही चौकशी झाली होती. साई रिसॉर्टशी संबंधित दहा कोटी 20 लाखांची संपत्ती जप्त केल्याची माहिती मिळतेय. यात साई रिसॉर्टसह अन्य ठिकाणच्या मालमत्तेचा समावेश आहे.

दरम्यान, रत्नागिरीतील केबल व्यावसायिकांचीही चौकशी या प्रकणात करण्यात आली आहे. या प्रकरणी चौकशी करून ग्रामसेवक, तलाठी यांचेही जबाब नोंदवण्यात आले होते.