मुंबईः छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होते, धर्मवीर नव्हते या वक्तव्यावर अजित पवार यांनी आज स्पष्टीकरण दिलं.
अजित पवार म्हणाले, किंबहुना पुराव्यानिशी त्यांनी आपला मुद्दा लावून धरला.त्यासोबतच आपल्याविरोधात एवढं रान का पेटवलं गेलं, यामागील हेतू काय आहे, मी वादग्रस्त वक्तव्य केलेलं नाही. राज्यपाल, भाजपचे मंत्री, प्रवक्ता यांनी केलेलं आहे. मी सभागृहात मी हा विषय मांडला. त्यानंतर दोन दिवसानंतर विरोध व्हायला सुरुवात झाली. असं का? विचारल्यावर अजित पवारांनी शंका व्यक्त केली.
दरम्यान, मी बोललो तेव्हा त्यांचा मास्टरमाइंड तेव्हा सभागृहात नव्हता. त्यांचा एक ग्रुप आहे. तो विचार करतो. कोणता मुद्दा काढायचा हे तिथं ठरतं. जनतेचं लक्ष कसं विचलित करायचं? त्यासाठी ही संधी आहे, हे शोधलं जातं, असे पवार म्हणाले.