मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे यांची संयुक्त पत्रकार परिषद आज मुंबईत पार पडली. बाळासाहेबांची शिवसेना आणि पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्या आघाडीची घोषणा आज जोगेंद्र कवाडे यांनी केली आहे.
बऱ्याच दिवसांपासून शिंदे यांच्यासोबत युती व्हावी यासाठी प्रयत्न सुरू होते. सर्वसामान्यांचं सरकार आहे, म्हणून त्यांच्यासोबत जावं अशी लोकांची भावना आहे. राज्यातील सर्व जाती धर्माच्या लोकांना आश्वस्त करणारे मुख्यमंत्री आहेत. त्यांचा धडाकेबाजपणा बघून पीपल्स रिपब्लिकन पक्षाने युतीचा निर्णय घेतला, असं जोगेंद्र कवाडे यांनी म्हटलं.

शिव-शाहू-फुले आणि बाळासाहेब ठाकरे यांचा विचार हा आमच्या आघाडीचा विचार आहे. यापुढे राज्यातील पाच विभागात आमच्या जाहीर सभा होतील, अशी माहिती देखील जोगेंद्र कवाडे यांनी दिली.(सौ. साम)