“माझा राजीनामा मागण्याचा अधिकार भाजपला….”: वादग्रस्त वक्तव्यानंतर अजित पवारांची पहिली मोठी प्रतिक्रिया!
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात छत्रपती संभाजीराजे हे धर्मवीर नसून ते स्वराज्यरक्षक होते, असे ठामपणे सांगितलं होतं. त्यांच्या या विधानावरून सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली.दरम्यान, आज पहिल्यांदाच अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली.
पवार म्हणाले, “मी काही चुकीचं बोललो नाही. महाराजांचा मी कुठेही अपमान केला नाही. उलट महापुरुषांबद्दल जे बेताल वक्तव्य करत आहेत, त्यांच्याविरोधात काय कारवाई केली याबाबत कोणीच काही बोलत नाहीत, माझा राजीनामा मागण्याचा अधिकार भाजपला नाही. मला विरोधी पक्षनेते हे पद राष्ट्रवादीने दिलेलं आहे. महापुरुषांचा अपमान करणाऱ्या भाजप नेत्यांवर कारवाई कधी होणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, स्वराज्य रक्षक ही उपाधी सर्वसमावेशक आहे. काही जण संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणतात, काही जन स्वतः धर्मवीर लावतात. काहींचे चित्रपट निघाले, भाग दोन पण येणार आहे, असा टोलाही अजित पवारांनी लगावला.