मुंबई: भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी अभिनेत्री उर्फी जावेद हिच्या फॅशनवर टीका करत ‘उर्फी जावेदवर तात्काळ कारवाई करा’ अशी मागणी काल पोलिस स्थानकात केली आहे. यानंतर चित्रा वाघ यांनी ट्विटरच्या माध्यमातून महिला आयोगाला उर्फीची दखल का घेत नाही असा सवाल केला आहे.
भाजप नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या, “भाषा नको तर कृती हवी.. सार्वजनिक ठिकाणी उघडंनागडं फिरणं ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे का ? मुंबईतल्या भर रस्त्यात उर्फीच्या या शरीरप्रदर्शनाचं जे अतिशय बिभत्स आहे हे राज्य महिला आयोग तिच्या या कृत्याचं समर्थन करतंय का?, भर रस्त्यात अर्धनग्न महिला खुलेआम फिरतीये. महिला आयोगानं स्वतः याची दखल घेत का नाही विचारला जाब ? विरोध उर्फी या व्यक्तीला नाही तर सार्वजनिक ठिकाणी उघडंनागडं फिरणं या वृत्तीला आहे. आणि हो …कायदा कायद्याचं काम करणारंच महिला आयोग काही करणार की नाही ?” असा सवाल यावेळी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारला आहे.

दरम्यान, उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा हा वाद अजून कुठपर्यंत जाईल हे सांगता येत नाही.