Latest Marathi News

BREAKING NEWS

‘पोलिसांत तक्रार दाखल केल्याचा परिणाम’; उर्फीचा ‘हा’ नवा व्हिडीओ व्हायरल!

0 578

मुंबई: अभिनेत्री उर्फी जावेद नेहमीच तिच्या चित्रविचित्र कपड्यांमुळे आणि बोल्ड लूकमुळे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी तिच्याविरोधात नुकतीच पोलिसांत तक्रार दाखल केली. मुंबईतील रस्त्यावर न्युडिटी पसरवल्याचा आरोप करत त्यांनी उर्फीच्या अटकेची मागणी केली. यानंतर उर्फीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी तिच्या कपड्यांवरूनही नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या.

 

या व्हिडीओ मध्ये उर्फी जेव्हा पापाराझींसमोर येते, तेव्हा कितीही तोकडे आणि बोल्ड कपडे असले तरी ती आत्मविश्वासाने फोटोसाठी पोझ देताना पहायला मिळते. मात्र या व्हिडीओमुळे उर्फीने चक्क पूर्ण बाह्यांचा टी-शर्ट आणि त्याखाली शॉर्ट्स घातले होते. एका कॅफेच्या बाहेर तिला पापाराझींनी पाहिलं, मात्र यावेळी ती कॅमेऱ्याला टाळताना दिसली. चेहरा लपवत ती त्या कॅफेमध्ये गेली.

Manganga

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

दरम्यान, उर्फीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला. ‘पहिल्यांदाच नीट कपडे परिधान केले आहेत म्हणून तिला लाज वाटत असावी’, अशी उपरोधिक कमेंट एकाने केली. तर ‘पोलिसांत तक्रार दाखल केल्याचा परिणाम’ असं दुसऱ्याने लिहिलं. ‘सर्वसामान्य कपडे परिधान केल्यानंतर कॅमेरापासून लपणारी ही पहिलीच अभिनेत्री असेल’, असंही नेटकऱ्यांनी म्हटलंय.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!