मुंबई: सध्या राजकारणात भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र येण्याच्या चर्चेला उधाण आले आहे. यावर आता संजय राऊत यांनी देखील यावर आपलं मत व्यक्त केलं आहे. तसेच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावर सडकून टीका केली आहे.
राऊत म्हणाले की, आम्ही पक्षासाठी आणि महाराष्ट्रासाठी कायमच तुरुंगात जायला तयार आहोत. आम्ही काही तुमच्यासारखे पळकुटे नाही. जर दीपक केसरकर मला तुरुंगात पाठवण्याची भाषा करत असतील तर २०२४ मध्ये त्यांनी तुरुंगात जाण्याची तयारी ठेवावी, असा इशारा संजय राऊतांनी केसकरांना दिला आहे.

दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीबाबत प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा सुरू आहे. राष्ट्रातील सत्ता उलथवून लावण्यासाठी दोन्ही शक्ती एकत्र येणं फार महत्वाचं आहे तसेच प्रकाश आंबेडकरांच्या स्वागतासाठी आम्ही तयार आहोत, असे संजय राऊत म्हणाले.