मुंबई: अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यातील संघर्ष वाढत असताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महत्त्वाची माहिती दिली .
रुपाली चाकणकर म्हणाल्या, “काही सामाजिक संघटनांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केलीय. त्यांनी संबंधित प्राधिकरणाकडे त्यांची तक्रार द्यावी. आजदेखील काही सामाजिक संस्था आणि व्यक्तींनी तक्रारी केल्या. ते यासाठी की उर्फी जावेद यांना संरक्षण द्यावं”, अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली.

“अशापद्धतीने कोणी थोबाड रंगवण्याची भाषा करत असेल तर उर्फीला धोका आहे, त्यांना संरक्षण द्यावं, अशी मागणी आली तर याबाबतीत आम्ही दखल घेऊ शकतो. याबाबत आम्ही महाराष्ट्र पोलीस महासंचालक किंवा पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून सुरक्षेची मागणी करु शकतो”, अशी भूमिका रुपाली चाकणकर यांनी मांडली.
दरम्यान, “स्थळ, काळ, परतवेळ, शुल आणि अशील शब्दाचा अर्थ बदलत जातो. त्यामुळे एखाद्याला वाटत असलेली अशील घटना शील असू शकते. पेहरावबाबत कोणतीही परिभाषा नमूद केलेली नाही. त्यामुळे आयोग त्याचा वेळ या गोष्टीसाठी वेळ वाया घालवणार नाही, संविधानाने आणि कायद्याने आपल्याला अधिकार दिलेला आहे. त्या अधिकारीचा आपण वापर करु शकतो, असंही रुपाली चाकणकर यांनी सांगितलं.