Latest Marathi News

BREAKING NEWS

 

“छत्रपती शिवाजी महाराज फक्त काय ब्रम्हणांचे पालक झाले का?” : ‘यांचे’ मोठे वक्तव्य!

0 250

पुणे: विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हतेच ते स्वराज्यरक्षक होते असे विधान केले होते, त्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांना त्याबाबत विचारले असता त्यांनी बोलणं टाळत दुसऱ्याच मुद्दा समोर आणला आहे.

 

 

“शिवाजी महाराज यांना गोब्राह्मण प्रतिपालक असे का म्हणतात असा सवाल उपस्थित केला आहे, शिवाजी महाराज यांच्यासोबत तानाजी मालुसरे होते ते कुणबी होते, शिवा काशीद नाव्ही होते, दलित समाजाचेही लोक त्यांच्यासोबत होते मग त्यांचे शिवाजी महाराज नाहीत का? असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. महाराज फक्त काय ब्रम्हणांचे पालक झाले का? इतरांचे पालक नाहीत का? त्यावेळेच्या ब्रम्हणांनी राज्यभिषेकाला विरोध केला त्यांचे कसे काय पालक होऊ शकतात? असा सवाल भुजबळ यांनी उपस्थित केला आहे.

 

तसेच, अजित पवार यांच्यावर आरोप होतोय तर मग छत्रपती शिवाजी महाराजांना गो ब्राम्हण प्रतिपालक का म्हटले जायचे. शिवाजी महाराज ब्रामह्णांचे पालक असु शकतात, गाईचेकसे? ही विशेषणे कोणी दिली ? असे प्रश्न भुजबळ यांनी उपस्थित केले आहे.

 

दरम्यान, सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने छगन भुजबळ हे पुण्यात होते. त्यावेळी त्यांनी हा मुद्दा समोर आणला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.