मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीनंतर ठाकरे आणि आंबेडकर यांची ही युती काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मान्य आहे का? हा प्रश्नच आहे. कारण प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत एक धक्कादायक विधान केले आहे.
आंबेडकर म्हणाले, “मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे गट सोडेल तेवढ्या जागा लढणार, मुंबई महापालिकेत 83 जागा लढण्यासाठी आम्ही तयार होतो. पण युतीसाठी आम्हाला काँग्रेसचा छुपा तर राष्ट्रवादीचा थेट विरोध आहे, तसेच, आम्ही शिवसेनेला सांगितलं तुम्ही जेवढ्या जागा सोडाल तेवढ्या जागांवर आम्ही निवडणूक लढवू”, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीमुळे विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्षांना फटका बसला होता. त्यामुळे वंचित आणि काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात मनभेद असू शकतात.