मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते, अजित पवार यांनी विधीमंडळात छत्रपती संभाजी महाराजांवर वक्तव्य केल्याने भाजपने राज्यभर अजित पवार यांच्याविरोधात आंदोलन सुरू केलं आहे. भाजपच्या आंदोलनावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपच्या आंदोलनावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, धर्म, जात यावर चर्चा केली पाहिजे. पण महागाई आणि बेरोजगारी या वरची प्रश्न प्रलंबित असताना भाजप अजित पवार यांच्या विधानावर आंदोलन करत आहेत. स्वत:चं अपयश झाकण्यासाठी विरोधकांवर असे आरोप करण्यात येत आहे. अजित पवार यांचं वक्तव्य विरोधकांनी नीट ऐकावे, त्यांनी कोणाचाही अपमान केलेला नाही. भाजपने महागाई आणि बेरोजगारी यावर आंदोलन केले तर बरं वाटलं असतं’, असे त्या म्हणाल्या.
दरम्यान, अजित पवार यांनी ‘छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवरी नव्हते, तर स्वराज्यरक्षक होते’, असे विधान केले होते.