औरंगाबाद: विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर त्यांच्यावर टीका केली जात आहे.अशातच आता मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी टीका केली आहे.
मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन म्हणाले, अण्णाजी दत्तो यांच्यावर राजद्रोह सिद्ध झाला. म्हणून मारले होते. मनू हा ब्राम्हण नव्हे तर क्षत्रिय होता मनुचा आणि ब्राम्हणांचा संबंध नाही, संभाजी महाराजांना जसं मारलं त्याचा मनुस्मृतीत कुठेही उल्लेख नाही, असंही महाजन म्हणालेत.
राष्ट्रवादी हा महाराष्ट्रातील समाजवादी पक्ष आहे.काँग्रेस पेक्षा जास्त मतं मुस्लिमांचे राष्ट्रवादीला जास्त मिळतात. अजित पवारांना वाटत असावे हिंदू धर्माला जवळचे मानले तर मुस्लिमांची मते मिळणार नाहीत. मुस्लिम मते सांभाळून ठेवण्यासाठी हा खटाटोप आहे. मुस्लिम मतांचे लांगुलचालन करण्यासाठी अजित पवारांनी हे वक्तव्य केलंय. असे वक्तव्य महाजन यांनी केले.