नाशिक : नाशिकमध्ये भोंदू बाबाकडून अंगात दैवी शक्ती असल्याचे सांगत आमिष दाखवून महिलेवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, नाशिकच्या उपनगर परिसरात राहणाऱ्या एका भोंदूबाबाने अंगात दैवी शक्ती आल्याचे भासवून एका महिलेवर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. विष्णू काशिनाथ वारुंगसे उर्फ देवबाबा याने एका महिलेवर त्याच्या राहत्या घरी आणि इतर ठिकाणी वारंवार महिलेच्या संमतीविना शाररिक संबंध केले. याबाबत कोणालाही सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देत आणि अंगात दैवी शक्ती असल्याचे भासवले होते.
दरम्यान, या प्रकरणी विष्णू काशिनाथ वारुंगसे उर्फ देवबाबा याची पत्नी, मुलगा आणि मुलगी यांचा देखील समावेश असल्याने देवबाबासह त्याची पत्नी सुनिता विष्णु वारुंगसे, उमेश विष्णू वारुंगसे व आणि देवबाबा याची मुलगी अश्या चौघांविरोधात उपनगर पोलिसांत ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.