चिंचवड: भाजपचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं 59 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरु होते. जगताप हे तीन टर्म आमदार राहिले आहेत. जगताप हे 2014 व 2019 मध्ये चिंचवड मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, भाजपचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी काही दिवसांपूर्वी दुर्धर अशा आजारावर मात केली अस बोललं जातं होत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा देखील होत होती. पण, दीपावलीनंतर त्यांना पुन्हा प्रकृतीच्या कारणास्तव रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचार सुरू असताना त्यांची मृत्यूशी सुरू असलेली अखेर संपुष्टात आली, अशी माहिती निकटवर्तीयांनी दिली.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील त्यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे.