पुणेः हिवाळी अधिवेशनच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजीराजे हे धर्मवीर नव्हते तर ते स्वराज्यरक्षक असल्याचे मत विधिमंडळात व्यक्त केले होते. त्यावर शिंदे गटाचे नेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला थेट जिहादी म्हणत त्यांनी हा पक्ष हिंदुत्वविरोधी असल्याचे मत व्यक्त केले आहे.
आढळराव पाटील म्हणाले, “ज्या छत्रपती संभाजीराजे यांनी शेकडो वर्षे धर्मवीर म्हणून काम केले, म्हणूनच त्यांना धर्मवीर म्हणतात. धर्मासाठीच त्यांनी आहुती दिली आहे. तरीही राष्ट्रवादी काँग्रेस हिंदुत्वविरोधी असल्याने त्या पक्षाला जिहादी पक्ष असल्याचा ठपका त्यांच्या ठेवला गेला आहे असं शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले.

तसेच, त्यांनी ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी म्हटलेल्या विधानाचा संदर्भ देत त्यांनी राष्ट्रवादीला जिहादी म्हटले आहे, याशिवाय, अजित पवार हे चर्चेत राहण्यासाठी अशी वक्तव्य करत आहेत.राष्ट्रवादी पक्षाला आता नव्याने इतिहास शिकवा पाहिजे असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.