Latest Marathi News

BREAKING NEWS

“ ठाकरे आणि आंबेडकर एकत्र आले, तरी काय परिणाम होणार नाही”: ‘यांचा’ मोठा दावा!

0 260

मुंबई: उद्धव ठाकरे यांच्याकडे ना शिवसैनिक आहेत, ना आंबेडकर यांच्याकडे भीमसैनिक, शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह सुद्धा एकनाथ शिंदे यांनाच मिळणार असा दावा आरपीआयचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत केला.

 

आठवले म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब आंबेडकर एकत्र आले, तरी फार परिणाम होणार नाही, कारण भीमशक्ती माझ्याकडे, तर शिवशक्ती एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. शिवाय उद्धव ठाकरे, बाळासाहेब आंबेडकर आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षात जागा वाटपामध्ये मतभेद होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या आघाडीचा काही उपयोग होणार नाही,असे ते म्हणाले.

Manganga

 

तसेच ते पुढे म्हणाले, “खासदार संजय राऊत म्हणतात तस राज्यात सत्तांतर होणार नाही, राज्य सरकार खंबीर आहे, शिंदे आणि फडणवीस यांचं सरकार 2024 पर्यंत कार्यकाळ पूर्ण करेल, आणि 2024 ला परत आमची सत्ता येणार आहे, असे रामदास आठवले म्हणाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!