“अशा उघड्या नागड्या फिरणाऱ्या मुली महाराष्ट्रात चालणार नाहीत, …….अन तेव्हा तिचं थोबाड रंगवेन”: उर्फी जावेदवर ‘यांची’ सडकून टीका!
मुंबई: काही दिवसांपुर्वीच चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदवर टीका करताना ह्या बाईला आवरा म्हणत तिच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर चित्रा वाघ यांच्या या वक्तव्याला उर्फी जावेदनेही जोरदार प्रत्यूतर देत राजकारणी लोकांना काही काम राहिले नाही, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर आता चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदवर सडकून टीका केली आहे.

भाजपा नेत्या चित्रा वाघ म्हणाली, “आम्ही काय करतो हे उर्फी सारख्या बाईला सांगण्याची गरज मला वाटत नाही. महाराष्ट्रात असा नंगा नाच चालणार नाही. संस्कृतीचे गोडवे गाणाऱ्यांना हे दिसत नाही का, आम्ही पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यावर आम्ही कारवाई केल्याशिवाय शांत बसणार नाही, चित्रा वाघ यांनी, अशा उघड्या नागड्या फिरणाऱ्या मुली महाराष्ट्रात चालणार नाहीत, ही बाई ज्या दिवशी सापडेल त्या दिवशी तिचे थोबाड रंगवेन, आणि नंतर ट्विट करत तुम्हाला काय झालं ते सांगेन असेही यावेळी सांगितले.
दरम्यान, चित्रा वाघ यांच्या या इशाऱ्यानंतर उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातील वाद आता चांगलाच पेटणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.