“औरंगाबादचं नामकरण छत्रपती संभाजीनगर नव्हे तर…..”: अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर ‘यांची’ मोठी प्रतिक्रिया!
नाशिक : अजित पवार यांच्या वादग्रस्त विधानामुळं भाजपचे सर्व फ्रंट आज, उद्या आंदोलन करतील. महिला मोर्चा नाशिकच्या वतीनं आज अजित पवार यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आलं, अशी माहितीही चित्रा वाघ यांनी दिली.दरम्यान यावेळी त्यांनी मोठी प्रतिक्रिया दिली.
चित्रा वाघ म्हणाल्या, “कुठलंही कारण नसताना वादग्रस्त वक्तव्य करून समाजामध्ये वातावरण करण्याचं काम केलंय. छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्माच्या संरक्षणासाठी बरचं काही भोगलं. तरीही संभाजी महाराज हे धर्मवीर नाहीत. असं अजित पवार यांच्यासारख्या प्रगल्भ नेत्यानं म्हणणं योग्य नाही. औरंगाबागचे नामकरण छत्रपती संभाजीनगर करा म्हणून ठरलं. शिंदे-फडणवीस यांचं सरकार आहे. ते केंद्राकडं पाठपुरावा करतील. ते नामकरण होईलसुद्धा. आता माझी अशी मागणी आहे. औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर असं करू नका. धर्मवीर संभाजीनगर करा, असे त्या म्हणाल्या.

तसेच, काहीही बोलून आमच्यावर हल्ले करा. आम्ही काय करतोय, हे उर्फीसारख्या उर्फीट बाईला सांगण्याची मला आवश्यकता वाटत नाही. जो … नाच चाललाय तो महाराष्ट्राची संस्कृती नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात संस्कृतीचा हा नाच दिसत नाही का, असा सवालही चित्रा वाघ यांनी केला.