मुंबईः हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शेवटचे भाषण करताना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल बोलताना त्यांनी संभाजीराजे हे धर्मवीर नव्हते, पण ते स्वराज्यरक्षक होते असं वक्तव्य केले होते.या वक्तव्यावरून भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी अजित पवार यांना पाकिस्तानात पाठवण्याची गरज आहे असं मत मांडले.यावर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
रुपाली पाटील म्हणाल्या, “राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज, महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य केले होते, त्यावेळी हे भाजपचे नेते कुठे गेले होते, आधी राज्यपालांना पाकिस्तानात पाठवा,नंतर बाकीचं बघू असा टोला त्यांनी भाजपला लगावत पलटवार केला आहे.

दरम्यान, यावर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.