पुणे : शिंदे-फडणवीस सरकार फार काळ सत्ते राहू शकणार नाही. हे सरकार लवकरच पडणार आहे, असं संजय राऊत म्हणत आहेत. त्याला आता शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उत्तर देत मोठे वक्तव्य केले आहे.
शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, “2024 ची निवडणूक शिवसेना शिंदेगट आणि भाजप जिंकणार आहे. 2024 पासून 2029 पर्यंत संजय राऊत हे सरकार पडेल अशीच आरडाओरड करत राहणार आहेत.पण 2024 ला पुन्हा एकदा शिंदे-फडणीवस सरकार सत्तेत येणार आणि 2029 पर्यंत आमचंच सरकार सत्तेत राहणार. संजय राऊत यांच्या विधानाला कुणीच सिरियस घेण्याची गरज नाही, असं शिवाजीराव आढळराव पाटील म्हणालेत.

दरम्यान, शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर आढळराव पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.