मुंबई: अभिनेत्री आलिया भट्टने एप्रिल 2022 मध्ये रणबीर कपूरशी लग्न केलं आणि नोव्हेंबरमध्ये मुलगी राहाला जन्म दिला. आलियाचं लग्न आणि तिची प्रेग्नेंसी हा सर्वाधिक चर्चेचा विषय होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आलियाने पहिल्या 12 आठवड्यांपर्यंत प्रेग्नेंसीबद्दल कोणालाच का सांगितलं नव्हतं, याचं कारणही आलियाने सांगितलं.
नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आलियाने सांगितलं की तिने 12 आठवड्यांपर्यंत प्रेग्नेंसीबद्दल कोणालाच सांगितलं नव्हतं, कारण तिला तसं सांगण्यात आलं होतं. याशिवाय वर्क कमिटमेंट्स आणि प्रोजेक्ट्समुळेही त्याविषयी कोणाला सांगता आलं नाही, असं ती म्हणाली.

तसेच, “सुदैवाने गरोदरपणामुळे माझ्या कामात कोणताच अडथळा आला नाही. मात्र हो, सुरुवातीच्या काही आठवड्यांत मला थकवा आणि उल्ट्यांचा त्रास जाणवला. मात्र तेव्हा मी याबद्दल कोणालाच काही बोलू शकत नव्हती. कारण पहिल्या 12 आठवड्यांपर्यंत तुम्हाला कोणालाच काही सांगायचं नसतं. असं अनेकजण म्हणतात, म्हणून मी प्रेग्नेंसीबद्दल कोणालाच सांगितलं नव्हतं.”
दरम्यान, ‘हार्ट ऑफ स्टोन’ हा हॉलिवूडचा पहिला प्रोजेक्ट आलियाने जानेवारी 2022 मध्ये साईन केला होता. या चित्रपटाचं शूटिंग तिने गरोदरपणात पूर्ण केलं. विशेष म्हणजे हा ॲक्शनपट होता. यासोबतच आलिया तिच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाचं प्रमोशनदेखील करत होती.