मुंबई: गेल्या काही दिवसांपासून आपल्या हटके डान्सच्या शैलीनं गौतमीने महाराष्ट्रातील तरुणांना भुरळ घातली आहे. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर गौतमी पाटीलच्या डान्सचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
या व्हिडीओत गौतमी पाटीलने चंद्रा या मराठी गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. गौतमीला चंद्रा गाण्यावर थिरकताना पाहून अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे. व्हायरल झालेला व्हिडीओ गौतमीच्या डान्स कार्यक्रमातील आहे. गौतमीने आपल्या इन्स्टाग्रावरून तो शेअर केला आहे.

पहा व्हिडीओ!
दरम्यान, काही दिवसांपूर्वी गौतमी पाटील हिच्यावर राज्यभरातून टीकेची झोड उठली होती. लावणीच्या नावाखाली अश्लील डान्स करते, असा आरोप अनेकांनी तिच्यावर केला होता. गौतमीच्या अश्लील डान्सची क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरलही झाली होती.