मुंबईः शिंदे गटात सध्या टोळीयुद्ध सुरु आहे. हे सरकार फार काळ टीकणार नाही, असं वक्तव्य राऊत यांनी आज केलं. त्यालाच शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलंय. पुढचे काही दिवस नाही तर 2024 पर्यंत आमचं सरकार राहणार आणि त्यानंतरही आम्हीच निवडून येणार, अशा शब्दात त्यांनी राऊत यांना सुनावलं.
संजय गायकवाड म्हणावे, ‘ आमच्यात टोळी युद्ध नाही. थोडे-फार समज-गैरसमज सगळीकडेच असतात. संजय राऊतांकडे आता फक्त 15 जण राहिलेत. किती सांभाळता येतील ते सांभाळा. आम्ही 50 एका जीवाचे एका दिलाचे आहोत. आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. 2024 ला आणखी किती येतात, तेही पहा. हे सगळे अपात्र होणार, मनसे, प्रहारशिवाय पर्याय नाही, असे म्हणत होते. पण आम्ही सत्तेत आलो… आता कोर्टात जे प्रकरण सुरु आहे, त्यात आम्हीच जिंकू, असं वक्तव्य गायकवाड यांनी केले आहे.

तसेच, मुख्यमंत्र्यांच्या भाषणात तुमच्यासारखा पांचटपणा नसतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाने जनतेला भुरळ घातली आहे. जे कामाचं आहे, तेच बोलतात.. संजय राऊत यांना चाभरेपणा करण्याची सवय आहे, असे म्हणत गायकवाड यांनी राऊत यांना चांगलेच सुनावले आहे.