मुंबई: भाजपने ‘मिशन 145’ सुरू केलं आहे. भाजपच्या या मिशनची राज्यात जोरदार चर्चा सुरू असतानाच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मात्र या मिशनची खिल्ली उडवली आहे.
संजय राऊत म्हणाले, “भाजपचे जर ‘मिशन 145’ असेल तर त्यात शिंदे गट कुठे आहे? भाजपचे ‘मिशन 145’ असेल तर शिंदे गटाच्या लोकांना धुणीभांडी करायला ठेवणार का? याचा अर्थ भाजपच्या पायरीवरही यांना कोणी उभं करत नाही. ही तात्पुरती तडजोड आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

तसेच ते पुढे म्हणाले, “महाराष्ट्राच्या विधानसभेत विकासावर, योजनांवर बोलण्याची संधी मिळत असते. मुख्यमंत्री जर सभागृहात उखाळ्यापाखाळ्या काढायला लागले तर राज्याच्या विकासावर कोणी बोलायचं? त्यांचं भाषण ऐका. हे गल्लीतलं भाषण आहे. उखाळ्यापाखाळ्या काढण्याचं. त्यांना एक संधी मिळाली आहे. भले ती बेकायदेशीर मिळालीअसेल. पण त्यांनी मुख्यमंत्री म्हणून संयमाने बोलायला हवं, असे म्हणत राऊत यांनी मुख्यमंत्र्यावर हल्लाबोल केला आहे.