औरंगाबाद : ठाकरेगटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाच्या शैलीवर टीका केली. त्यावर आता केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी संजय राऊत यांच्यावर कडक शब्दात टीका केली आहे.
यावेळी ते म्हणाले, “संजय राऊत यांचं बोलणं म्हणजे निव्वळ बडबड आहे, संजय राऊत म्हणजे विटलेली भाजी आणि कडी आहेत. भाजी विटली की ती टाकूनच द्यावी लागते. तसं राऊतांचं झालं आहे, असं भागवत कराड म्हणालेत.

तसेच ते पुढे म्हणाले, संजय राऊत यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. त्यांच्या बोलण्यात काही तथ्य नसतं. त्यामुळे त्यांचं बोलणं सिरियसली घेण्याची गरज नाही, असं म्हणत भागवत कराड म्हणाले.