Latest Marathi News

BREAKING NEWS

नवीन वर्षाची सुरवातच केली वाहनांच्या तोडफोडीने

0 293

पिंपरी : शहरात दहशत पसरविण्यासाठी रिक्षातून आलेल्या टोळक्याने रहाटणी आणि सांगवी परिसरातील १५ ते २० वाहनांची तोडफोड केल्याची घटना रविवारी (दि. १) पहाटे दोनच्या सुमारास घडली. गस्तीवर असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने टोळक्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला धक्का देत टोळक्याने पळ काढला.

वाकड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सत्यवान माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे दोनच्या सुमारास काहीजणांच्या टोळक्याने रिक्षा चोरून त्या रिक्षातून रहाटणी येथे गोडांबे कॉर्नर येथील परिसरात आले. परिसरात पार्क केलेल्या वाहनांची दगड, विटा तसेच काठ्यांनी तोडफोड केली. गस्तीवर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने त्यांना पहिले असता पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना धक्का देत टोळक्याने पळ काढला.

Manganga

या परिसरात दोन बस, काही चारचाकी वाहने, तीनचाकी रिक्षा अशी १२ वाहने फोडल्याचे समोर आले आहे. नक्की किती गाड्या फोडल्या आहेत याबाबत माहिती घेण्याचे काम सुरू आहे. टोळक्याने चोरी केलेली रिक्षा कासारवाडी परिसरात सोडून देऊन पळ काढला. दरम्यान, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना केली आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!