Latest Marathi News

BREAKING NEWS

आमदार भेटले नाहीत म्हणून आत्महत्येचा प्रयत्न

0 285

मुंबई : आमदार भेटले नाहीत म्हणून ४० वर्षीय व्यक्तीने नशेमध्ये आमदार अमीन पटेल यांच्या कार्यालयातच स्वतःवर चाकूने वार करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना भेंडी बाजार येथे समोर आली आहे. याप्रकरणी जे. जे. मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जे. जे. पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले मंगेश ब्राह्मणे (३८) यांच्या फिर्यादीवरून पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
पोलिसांच्या चौकशीत, त्याचे नाव मोहमद हुसेन इनायतअली खान (४०) असल्याचे समजले. १२:५०च्या सुमारास नारळ तोडण्याचा चाकू हातात घेत तो कार्यालयात आला. आमदारांना भेटायचे आहे सांगताच, तेथील कर्मचाऱ्यांनी आमदार अधिवेशनासाठी नागपूरला असल्याचे सांगितले. तसेच त्याला चाकू खाली ठेवण्यास सांगितले. मात्र, आमदारांना भेटू दिले नाही तर आत्महत्या करणार असल्याचे सांगितले. तेथून तो आमदारांच्या कार्यालयात गेला व त्याने स्वतःवर चाकूने वार करून घेतले.

Manganga

याबाबत समजताच जे. जे.तील डॉक्टरांशी संपर्क करून त्याला तत्काळ उपचार उपलब्ध करून दिले. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!