पुणे : महाविकास आघाडीचे नेते म्हणतात, की नवीन वर्षात सरकार पडेल. यावर बोलताना सुषमा अंधारे यांनी भाष्य केले. तसेच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
यावेळी त्या म्हणाल्या कि, हे आम्ही चार-सहा वर्षांपासून सांगतोय की, नवीन वर्षात सरकार पडेल. खरं तर २०२४ ला निवडणुका व्हायला हव्यात. पण, शिंदे-फडणवीस सरकार २०२३ ला पडेल. त्याची अनेक लक्षणं दिसत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना त्रास देणं सुरू केलं. भाजपच्याच तीन आमदारांनी तारांकित प्रश्न विचारून एकनाथ शिंदे यांना भूखंडप्रश्नी अडचणीत आणले. अधिवेशनात ज्या चार मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढले ते चारही मंत्री शिंदे गटाचे आहेत. ज्या १५ जणांना देवेंद्र फडणवीस यांनी क्लीनचीट दिली ते सर्व जण भाजपचे आहेत.

तसेच त्या पुढे म्हणाल्या, “भाजपच्या लोकांचे संरक्षण, शिंदे गटाच्या लोकांची गच्छंदी होत आहे. त्यात काल अब्दुल सत्तार यांचं स्टेटमेंट आलंय. धुर्त आणि कपटी राजकारणाचं दुसरं नाव हे देवेंद्र फडणवीस आहेत, असे म्हणत त्यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली.