नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या राजौरीच्या डांगरी गावात गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेत ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८ लोक जखमी झाले आहेत. त्यामुळे जखमींना राजौरीच्या मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात दाखल केले.
राजौरीते रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. महमूद यांनी सांगितले की, राजौरीच्या डांगरी गावात गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेत ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७ जण जखमी झाले आहेत. जखमी नागरिकांवर उपचार सुरू आहेत. पोलीस आणि जिल्हा प्रशासन घटनास्थळी पोहोचले आहेत. जखमींना लागलेल्या गोळ्या जमा केल्या आहेत.

दरम्यान, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर परिसरात नाकाबंदी लावली आहे.