शिर्डी : शिवसेना पक्षाला खिंडार पडून आता सहा महिने झाले आहेत. या सगळ्या घडामोडींदरम्यान विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनावेळी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे समोरासमोर आल्याची बातमी समोर आली होती. या भेटीवर आज दीपक केसरकर यांनी शिर्डीत पत्रकारांना प्रतिक्रिया देताना भूमिका मांडली.
दीपक केसरकर म्हणाले, नेमकं काय घडलं याचं आत्मपरिक्षण मी केलं पाहिजे तसं त्यावेळच्या आमच्या पक्षप्रमुखांनी देखील केलं पाहिजे. आणि तसं झालं तर मग शिवसेना एकसंघ व्हायला वेळ लागणार नाही”, “पैशांनी प्रेम विकत घेता येत नाही. पैशांसाठी मनुष्य विकला जात नाही. त्याचं मन जिंकायला लागतं. ते मन एकनाथ शिंदे यांनी जिंकलंय. म्हणून आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. काय-काय झालं ती प्रत्येक गोष्ट सांगेन. नवीन वर्ष आहे म्हणून उत्तर दिलं नाही”, असं दीपक केसरकर यावेळी म्हणाले.

दरम्यान, “कटुता कमी करणं हे उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे. मी काल ज्यावेळेला त्यांना भेटलो तेव्हा ते भावनाविवश झालेले होते. ते काय बोलले, मी त्यांना मानणारा, त्यांच्याबद्दल आदर ठेवणारा मनुष्य आहे. त्यामुळे मी त्यांना काहीच उत्तर दिलेलं नव्हतं”, असं दीपक केसरकर यांनी सांगितलं.