मेष:-
कार्यक्षेत्रातील बदल आपल्यासाठी सकारात्मक असेल. कामात घाई गडबड करू नका. उत्तम वर्तनाने सर्वांना आपलेसे करून घ्याल. आजचा दिवस शुभ आहे. दिवसभर धावपळ करावी लागेल.
वृषभ:-
प्रिय व्यक्तीच्या भेटीने मन आनंदी होईल. घरातील कामे वेळेवर आटोपती घ्या. हातातील कामात यश येईल. मनाची चलबिचलता जाणवेल. करमणुकीकडे कल वाढेल.

मिथुन:-
घरातील वातावरण प्रसन्न राहील. कामातील अपेक्षितता वाढेल. दिवस चांगला जाईल. मनातील इच्छा पूर्ण होईल. मौल्यवान वस्तु खरेदी कराल.
कर्क:-
भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. उधारी वसूल व्हायला सुरुवात होईल. सारासार विचार करावा. धनवृद्धीचे योग जुळून येतील. व्यावसायिक योजनांना बळ मिळेल.
सिंह:-
आहारावर विशेष नियंत्रण ठेवा. बोलताना आक्रमक शब्द वापरू नका. बाहेरील पदार्थ खाणे टाळावे. जुनी कामे विनासायास पूर्ण होतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
कन्या:-
काही गोष्टी जुळवून घ्याव्या लागतील. खर्च समाधानकारक असेल. वैवाहिक जीवन संमिश्र राहील. मानसिक शांतता लाभेल. विरोधक नामोहरम होतील.
तूळ:-
काही गोष्टी लपवण्याकडे कल राहील. एखादी गोष्ट संभ्रमित करू शकते. जोडीदाराचे उत्तम सान्निध्य लाभेल. मित्राचा सल्ला घ्याल. मत मांडताना थोडासा विचार करावा.
वृश्चिक:-
बोलताना तारतम्य बाळगवे लागेल. झोपेची तक्रार जाणवेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. संयमाने परिस्थिती हाताळावी लागेल. आर्थिक स्थिती चांगली राहील.
धनू:-
मानसिक शांतता लाभेल. घरासाठी खरेदी केली जाईल. भावंडांशी स्नेहभाव वाढेल. आनंदाची अनुभूति घ्याल. सांसारिक सौख्यात वाढ होईल.
मकर:-
वाहन विषयक कामे निघतील. अचानक उद्भवणार्या खर्चावर आळा घालावा. फार गरज नसेल तर प्रवास टाळावा. घरात तुमच्या शब्दाला महत्त्व मिळेल. गोड बोलून कामे करून घ्याल.
कुंभ:-
अचानक खर्चात भर पडू शकते. जुने प्रश्न मार्गी लावाल. हातातील अपूर्ण कामाकडे आधी लक्ष द्यावे. किरकोळ समस्या सोडवू शकाल. बोलताना शब्दांचे वजन लक्षात घ्या.
मीन:-
तणाव दूर होऊ शकेल. उगाच रागराग करू नका. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. कामातील उत्साह वाढेल. वैवाहिक समस्यांकडे लक्ष द्यावे.