राजस्थान: राजस्थानच्या सीकरमध्ये रविवारी सांयकाळी ४ वाजता तीन वाहनांचा अपघात झाला आहे. या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६ जण जखमी झाले आहेत. तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, पिकअप आणि दुचाकीमध्ये अपघात झाला. याच वेळी या दोन्ही वाहनांना ट्रकने धडक दिली. या भीषण अपघातात ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतामध्ये एक दुचाकीस्वार आणि पिकअपमधील ८ जणांचा सामावेश आहे. पिकअपमध्ये राहणारे सर्व सामोद येथील राहणारे होते. तर दुचाकीस्वार हा खंडेला येथील सुंदरपुरा येथे राहणारा होता. जखमींमध्ये दुचाकीस्वाराची पत्नी आणि त्यांचा दोन मुलांचा सामावेश आहे. पिकअपमधील राहणारे २० लोक खंडेला येथे राहणारे आहे. पिकअपमधील प्रवासी हे गणेश धाम मंदिरातून दर्शन घेऊन परतत होते. त्यावेळीच ही दुर्घटना घडली.

दरम्यान, या अपघातानंतर खासदार सुमेधानंद सरस्वती आणि माजी केंद्रीय मंत्री सुभाष महरिया हे जखमींना भेटण्यासाठी सीकर येथे पोहोचले आहेत.