“उद्धव ठाकरे यांनी ऐकूण घेतले नाही म्हणून आम्हाला नाईलाजाने ….”: शिंदे गटातील ‘या’ नेत्याने केली खंत व्यक्त!
जळगाव: पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं एक स्वप्न आहे, हर घर जल, हर घर नल. २०२४ मध्ये या गुलाबराव पाटीलला पाणीवाला बाबा म्हणून ओळखतील,असे गुलाबराव पाटील आज म्हणाले, तसेच, त्यांनी बोलताना उद्धव ठाकरे यांनी ऐकलं नाही. म्हणून दुसरा मार्ग पत्करला अशी खंत व्यक्त केली आहे.
तसेच ते पुढे म्हणाले, “टीका माझ्यावर करायला पाहिजे. ज्या झाडाला फळ असतात, त्या झाडाला लोकं दगडं मारतात. गुलाबराव साधा थोडी आहे. त्याला सुगंध आहे. तसे काटेपण आहेत. ज्यावेळी शिवसेनेत हा प्रकार घडला. उद्धव ठाकरे यांनी ऐकूण घेतले नाही. नाईलाजानं आम्हाला पक्ष टिकविण्याकरिता नवीन मार्ग पत्करावा लागला. तो माझ्या जीवनातला सर्वात दुःखाचा क्षण आहे, असंही गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.

दरम्यान, गेली नऊ वर्षे लोकं वेगवेगळे कार्यक्रम साजरे करतात. मी मतदारसंघात फिरतोय. शिवसेनेचं वैभव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये उभं करण्याचा संकल्प घेतलाय, असं गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.