मुंबई : संभाजी महाराज यांच्यावरील वक्तव्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर टीका केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, बोलताना सर्वांनी माहिती घेऊन बोललं पाहिजे. काही तारतम्य बाळगूण बोललं पाहिजे. एवढीच माझी इच्छा आहे. संभाजी महाराज यांनी देशासाठी, स्वराज्यसाठी आणि धर्मासाठी त्याग केलाय. धर्मवीर ही पदवी संभाजी महाराज यांनी आम्ही तुम्ही दिलेली नाही. धर्मासाठी दिलेल्या त्यागाबद्दल त्यांनी धर्मवीर म्हणतात. अजित पवार यांच्यासारख्या व्यक्तीनं असं बोलणं योग्य नाही, असं मला वाटतं. अशाप्रकारचं वक्तव्य हे निंदाजनक आहे.

दरम्यान, शिंदे यांच्या या प्रतिक्रियेवर जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युतर दिलंय. जितेंद्र आव्हाड म्हणाले, शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेल्या स्वराज्याच्या सीमांचं रक्षण करण्याचं काम संभाजी महाराज यांनी केलं. ते धर्मरक्षकही होते, त्यामध्ये एवढा बाऊ करण्याची गरज नाही, असे ते म्हणाले.