Latest Marathi News

BREAKING NEWS

महत्वाचे : हायवे रस्ता कॉंक्रिटीकरणाचे काम निकृष्ट : थेट मुख्यमंत्री, जिल्ह्याधिकारी यांच्याकडे तक्रार

0 33

म्हसवड/अहमद मुल्ला : म्हसवड येथे सुरू असणारे सातारा पंढरपूर हायवे अंतर्गत चे रस्ता कॉंक्रिटीकरण बांधकाम अत्यंत निकृष्ट स्वरूपात सुरू असून या कामावर कोणत्याही शासकीय यंत्रणेचे नियंत्रण नसल्याने ठेकेदाराने मनमानी सुरू केल्याची लेखी तक्रार राज्य किसान काँग्रेसचे उपाध्यक्ष कृषिरत्न प्रा.विश्वंभर बाबर यांनी राज्याचे मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी सातारा यांच्या कडे केली आहे.

सातारा पंढरपूर या राज्य महामार्ग क्रमांक 141 च्या कामाचा शुभारंभ अंदाजे सहा वर्षांपूर्वी झाला. आजही अनेक ठिकाणी या रस्त्याचे काम रखडलेल्या स्वरूपात आहे. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये जनतेतून उठाव झाल्याने म्हसवड शहरा नजीकचे ठप्प असणारे काम नुकतेच सुरू झाले. सदर काम वेळेत व दर्जेदार झाले पाहिजे ही तमाम जनतेच्या अपेक्षा आहे. गत काही कालावधीत रस्ता अर्धवट उकरून ठेवल्यामुळे तसेच धुळीच्या साम्राज्यामुळे स्थानिक रहिवासी व प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला हे सर्वांनाच माहित आहे. प्रलंबित काम सुरू झाल्याने जनतेत उत्साह निर्माण झाला. मात्र, या कामावर कोणाचा अंकुश आहे की नाही? हा प्रश्न या कामाच्या दर्जावरून उपस्थित होत आहे.

Manganga

म्हसवड शहर हद्दीत सुरू असणारे काम अत्यंत निकृष्ट स्वरूपात सुरू असलेले दिसून येत आहे. वास्तविक पाहता या रस्त्याचे काँक्रिटीकरण पेवर व इतर अत्याधुनिक मशनरीने होणे अपेक्षित असताना सुद्धा ठेकेदाराने सदर काँक्रिटीकरण मॅन्युअली स्वरूपात केलेली आहे. उपस्थित कर्मचाऱ्यांना त्याबाबत विचारणा केली असता पेवर मशीन बंद असल्याने काम कामगाराद्वारे करीत असल्याचे सांगितले.

त्यानुसार ठेकेदार प्रतिनिधी सत्यनारायण व नागेश्वर राव यांच्याकडे विचारणा केली असता सुरुवातीला त्यांनी उडवाउडीची उत्तरे दिली. काहीसे खडे बोल सुनावल्यानंतर त्यानी आपली चूक मान्य केली मात्र काम तसेच चालू ठेवले. त्यामुळे काम सुरू असताना शासकीय यंत्रणेचा कोणताही अधिकारी किंवा प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित राहत नसल्याने कामावर कोणाचाही अंकुश नसल्याचे दिसून येत आहे.

रस्त्याच्या अर्धवट कामामुळे म्हसवडकरांना गेले वर्षभरात प्रचंड त्रास सहन करावा लागलेला आहे. ठेकेदार काम करतोय म्हणजे उपकार करत नाही. सदर रस्ता काँक्रिटीकरण्याचे काम मशीनद्वारे करावे, सिमेंट व इतर मटेरियल चा दर्जा चांगला असावा, केलेल्या कॉंक्रिटीकरण कामावर नियमितपणे पुरेशा प्रमाणात पाणी मारावे. तसेच या ठिकाणी शासकीय अधिकाऱ्याची उपस्थिती गरजेची असल्याची मागणी प्रा .विश्वंभर बाबर यांनी निवेदनात करण्यात आलेली आहे.

 

         हे ही वाचा 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!