नवी दिल्ली: ट्विटर विकत घेतल्यापासून एलॉन मस्क यांची आर्थिक स्थिती बिकट होत चालली आहे. ट्विटरच्या खर्चाचा भार कमी करण्यासाठी एलॉन मस्कने आधी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले, त्यानंतर ऑफिसमधून वस्तू विकायला सुरुवात केली. ट्विटरचा खर्च कमी करण्यासाठी मस्कने आता मर्यादा ओलांडली आहे.
एका रिपोर्टनुसार, ट्विटरच्या कार्यालयाची अवस्था सध्या फार वाईट झाली आहे. येथील शौचालय अस्वच्छ असून त्यातून दुर्गंधी पसरली आहे. कर्मचाऱ्यांना टॉयलेट पेपरही घरून आणण्यासाठी सांगण्यात आले आहे.

दरम्यान, एलॉन मस्क यांनी ट्विटर कंपनी खरेदी केल्यापासून ते त्यांच्या अनेक निर्णयांमुळे प्रचंड चर्चेत आहेत. मस्क यांनी ट्विटरचा ताबा मिळताच कंपनी आणि ट्विटर प्लॅटफॉर्ममध्येही अनेक मोठे बदल केले. आताही ट्विटरच्या ऑफिसमधील वातावरण सुधारलेले नाही.