Latest Marathi News

सोलापूर: दारू कारखान्यात स्फोट; पाच मृत्यू जणांचा मृत्यू; मयताचा आकडा वाढणार?

0 380

सोलापूर: जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील शिराळे-पांगरी हद्दीत असलेल्या शोभेच्या दारू कारखान्यात नववर्षाच्या पहिल्या दिवशी मोठा स्फोट झाला. या स्फोटात पाच जणांचा मृत्यू झाला असून २० ते २५ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

 

याबद्दल अधिक माहिती अशी कि, बार्शी तालुक्यातील शिराळे-पांगरी हद्दीत शोभेच्या दारूचा कारखाना आहे. याठिकाणी फटाके, दारूगोळे तयार करण्यात येतात. याठिकाणी रविवार १ जानेवारी २०२३ रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक स्फोट झाला. या स्फोटातील जखमींना उपचारासाठी रूग्णालयात नेण्यात येत आहे. कारखान्यातून आगीचे लोट मोठ्या प्रमाणात येत असल्याने बचावकार्यास अडचणी निर्माण येत आहेत. दुपारी ४ पर्यंत ४ मृतदेह कारखान्यातून बाहेर काढण्यात आले होते.

Manganga

 

दरम्यान, मोठया प्रमाणात आग लागल्याने मयताची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!