मुंबई: कुछ कुछ होता है’ या चित्रपटातील छोटी अंजलीने तिच्या क्युटनेसने सर्वांची मनं जिंकली होती. दरम्यान, अंजलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सना सईदने नुकताच साखरपुडा केला. सनाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
नवीन वर्षाचं निमित्त साधत बॉयफ्रेंडने सनाला प्रपोज केलं आणि तिने होकार दिला. सना गेल्या काही महिन्यांपासून साबा वॉनरला डेट करतेय. साबा हा हॉलिवूड साऊंड डिझायनर आहे. तो लॉस एंजिलिसमध्ये राहतो. सबाने याआधीही त्याच्यासोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

दरम्यान, सना पहिल्यांदाच ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटात बालकलाकार म्हणून दिसली होती. या चित्रपटानंतर तिने ‘हर दिल जो प्यार करेगा’ आणि ‘बादल’मध्ये बालकलाकार म्हणून काम केलं. 2012 मध्ये सना ही करण जोहर दिग्दर्शित ‘स्टुडंट ऑफ द इअर’ चित्रपटात दिसली होती.