Latest Marathi News

BREAKING NEWS

आशियातील सर्वात श्रीमंत गाव आहे भारतात; जाणून घ्या कुठे आहे भारतात?

0 678

नवी दिल्ली: हिमाचल प्रदेशला ‘सफरचंद’मुळे जगभरात ‘अॅपल राज्य’ म्हणून ओळख मिळवून दिली आहे. तसेच याच सफरचंदामुळे शिमला जिल्ह्यातील चौपालच्या मडावग गावाला आशियातील सर्वात श्रीमंत गाव बनले आहे.

 

मडावगमधील प्रत्येक कुटुंबाचे सरासरी वार्षिक उत्पन्न ३५ लाख ते ८० लाखांच्या दरम्यान आहे. सफरचंद पीक आणि दर यावर उत्पन्नात वाढ किंवा घट अवलंबून असते. मडावगमध्ये २२५हून अधिक कुटुंबे आहेत. येथील फळबागधारक दरवर्षी सरासरी १५० ते १७५ कोटी रुपयांची सफरचंद विकत आहेत. आता मडावग हे आशियातील सर्वात श्रीमंत गाव असल्याचे म्हटले जाते.

Manganga

 

दरम्यान, मडावग गाव आणि संपूर्ण पंचायत सफरचंद लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. पण, मडावगच्या दाशोलीचे सफरचंद दर्जेदार किन्नोर आणि जम्मू काश्मीरच्या सफरचंदांनाही मागे टाकत आहे. त्यामुळे मडावग आणि दशोलीची सफरचंद राज्यातील आणि देशातील इतर भागातील बाजारपेठांमध्ये हातोहात विकली जाते. मडावगचे सफरचंदला परदेशातही खूप मागणी आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!