नवी दिल्ली : नवीन वर्षात भविष्यातील आर्थिक खर्चासाठी तरतूद करणे अत्यंत आवश्यक आहे. पंतप्रधान वय वंदना या योजनेत तुम्ही वार्षिक 72 हजार रुपये प्राप्त करु शकता. त्यामुळे औषधपाण्यावरील खर्च भागविता येऊ शकतो. या योजनेत एकरक्कमी 9 लाख रुपयांची गुंतवणूक तुम्हाला आयुष्याच्या संध्याकाळी फायदेशीर ठरु शकते. या योजनेत तुम्हाला वार्षिक 72 हजार रुपयांची पेन्शन मिळेल. या योजनेवर LIC सध्या 7.40% वार्षिक व्याज देते.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, केंद्र सरकारच्या या योजनेचा नाव प्रधानमंत्री वय वंदना योजना आहे. एलआयसीच्या मार्फत ही योजना राबविण्यात येते. त्यामुळे उतारवयात लोकांना सामाजिक सुरक्षा मिळते. या योजनेतंर्गत पेंशनधारकाला मासिक, त्रैमासिक, सहामही, वार्षिक आधारावर पेन्शन देण्यात येते.या योजनेत 60 वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त वयाची वयोवृद्ध नागरीक अर्ज करु शकता. या योजनेत जवळपास 15 लाख रुपयांची गुंतवणूक करता येऊ शकते.

दरम्यान, LIC 10 वर्षानंतर एकरक्कमी गुंतवणूक परत करते. तसेच मासिक, त्रैमासिक, सहामही, वार्षिक आधारावर पेन्शन ही देते. अचानक अडचण आल्यास अथवा पॉलिसी सरेंडर केल्यास तुम्हाला योजनेत गुंतवलेली रक्कम परत करण्यात येते.