मुंबई: विचित्र कपडे घालून सर्वत्र फिरत असल्यामुळे उर्फीला अटक करण्याची मागणी देखील अनेकांनी केली. अशातच एक ट्विट करत चित्रा वाघ यांनी उर्फीला अटक करण्याची मागणी केली. दरम्यान, चित्रा वाघ यांच्या ट्विटवर उर्फीने देखील सडेतोड उत्तर दिलं आहे.
उर्फी जावेद ट्विट करत म्हणाली, ‘बलात्काऱ्यांसाठी माझ्या कपड्यांना दोष देणं सहज सोपं आहे. माझ्यावर लक्ष केंद्रीत करून जनतेची दिशाभूल करताय…, तुम्ही अशा महिलांची मदत का नाही करत, ज्यांना खरंच तुमच्या मदतीची गरज आहे? महिलाचं शिक्षण, लाखो प्रलंबित बलात्कार प्रकरणं… या गोष्टी तुम्ही का नाही करत?’ असं देखील उर्फी ट्विटच्या माध्यमातून म्हणाली.

दरम्यान, आता उर्फीला अटक होणार कि नाही याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.