नवी दिल्ली: नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. कमर्शियल गॅस सिलिंडरच्या दरात 24 ते 25.5 रुपयाने वाढ करण्यात आली आहे. मात्र, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही दरवाढ करण्यात आलेली नाही.
माहितीनुसार, दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 25 रुपयाने वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दिल्लीतील व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर 1769 रुपये झाले आहेत. मुंबईतही व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर 25 रुपयाने महागल्याने आता मुंबईत 1721 रुपयांना व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळणार आहे.

दरम्यान, घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे दिल्लीत एक घरगुती गॅस सिलिंडर 1053, कोलाकात्यात 1079, मुंबईत 1052.50 आणि चेन्नईत 1068.50 रुपयात मिळणार आहे.