मुंबई : भररस्त्यात अंगप्रदर्शन केल्याने ऊर्फीच्या या वर्तनावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेत कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे उर्फीच्या अडचणीत वाढ झाली आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, भाजप महिला मोर्च्याच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी ट्विट करून पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे उर्फीची तक्रार केल्याचं म्हटलं आहे. मुंबईच्या रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी बिभत्स आणि किळसवाणे अंगप्रदर्शन करत फिरणाऱ्या उर्फी जावेदवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी यासाठी मुंबईचे पोलीस आयुक्त आणि सहआयुक्त कायदा व सुव्यवस्था यांची भेट घेण्यात आल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. तसेच आपल्या तक्रारीचं पत्रंही त्यांनी ट्विट केलं आहे.

दरम्यान, उर्फी जावेद या अभिनेत्रीने भररस्त्यात आपल्या देहाचे केलेले प्रदर्शन समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय बनले आहे. घटनेने दिलेला आचार, विचार स्वातंत्र्याचा हक्क इतक्या उघड्या नागड्या मनोवृत्तीत प्रकट होईल याची कोणीच कल्पना केली नसेल, असं चित्रा वाघ यांनी या तक्रारीत म्हटलं आहे.तसेच, उर्फीवर भारतीय दंड विधानाच्या कलम 294 नुसार गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.