Latest Marathi News

BREAKING NEWS

पंढरपूर: प्रेमाला विरोध केला म्हणून जन्मदात्या वडिलांनासोबत मुलानेच केले भयंकर कृत्य!

0 447

पंढपुर: पंढरपूर तालुक्यातील कासेगाव परिसरात शुक्रवारी रात्री एका अल्पवयीन मुलीशी लग्न करण्यास विरोध करणाऱ्याला बापाला स्वत:च्या मुलानेच पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. सोहेल बागवान असं आरोपी मुलांचे नाव असून त्याला अटक केली आहे.

 

याबद्दल अधिक माहिती अशी कि, लातूर येथील एका अल्पवयीन मुली बरोबर सोहेल बागवानचे काही दिवसांपासून प्रेम संबंध होते. दोघेही लग्न करणार होते. परंतु त्यांच्या लग्नास अफजल बागवान यांचा विरोध होता. दरम्यान, अल्पवयीन मुलगी व तिचा भाऊ शुक्रवारी सकाळी लातूर होऊन पंढरपुरात आले होते. त्यांनी पंढरपुरातील नवीन एसटी बस स्थानक समोर सोहेल बागवान यांची भेट घेतली. त्यानंतर अल्पवयीन मुलगी आणि तिच्या भावाने तहसील कार्यालया जवळ जावून अफजल बागवान यांची भेट घेवून कासेगाव येथे मामाकडे जायचे आहे असे खोटे सांगून रिक्षात बसवून नेले. पंढरपूरपासून काही अंतरावर गेल्यानंतर मध्येच रिक्षा थांबवून ते पायी पुढे गेले.

Manganga

 

 

दरम्यान, रस्त्यात दबा धरून बसलेल्या सोहेल बागवान याने वडील अफजल बागवान यांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. यावेळी सोबत असलेल्या अल्पवयीन मुलीने व तिच्या भावाने अफजल बागवान यांचे हातपाय बांधून डोक्यात दगड घालून हत्या केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!