मुंबई: टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक, फलंदाज ऋषभ पंत अपघातामुळे रुग्णालयात उपचार घेत आहे. ऋषभ पंतने त्याचा अपघाताबाबत मोठा खुलासा केला आहे. दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोशिएशनचे डायरेक्टर श्याम शर्मा यांनी ऋषभ पंतची रुग्णालयात भेट घेतली. पंतने श्याम शर्मा यांच्याशी बोलताना अपघाताबाबत मोठा खुलासा केला आहे.
माहितीनुसार, “पंतचा अपघात हा डुलकी लागल्याने झाला नाही. तर रस्त्यावरील खड्ड्यामुळे झाला. ‘रात्रीची वेळ होती. त्यावेळी अचानक रस्त्यात खड्डा समोर दिसला. त्या खड्ड्यापासून वाचवून वाहन चालविण्याच्या नादात अपघात झाला’, असा खुलासा श्याम शर्मा यांनी केला.

दरम्यान, ‘डीडीसीए’चे राजन मनचंदा यांनी सांगितले की, ‘आतापर्यंत ऋषभचे उपचाराबाबत रिपोर्ट आले आहेत, त्यात त्याला गंभीर दुखापत झाली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आशा आहे की, पंत २ महिन्यांनी मैदानात परतू शकतो.